सर्व जगाला export oriented economy निर्यातीभिमुख अर्थव्यवस्थेचे डोस पाजणारी अमेरीका व अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ ह्याबाबतीत मुग गिळुन गप्प बसतात कारण हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. सर्व जगाला सांगुन की एक्स्पोर्ट मुळे तुमची इकोनोमी सुधरेल. तुमच्या लोकांची स्थिती सुधारेल वगैरे वगैरे.

माफ करा, मी काही इकॉनोमिस्ट नाही, त्यामुळे मला ह्यातील बारकावे समजत नाहीत. पण वरील विधान बरेचसे ओढूनताणून (मला खरे तर  far fetched  म्हणायचे आहे, नक्की मराठी शब्द पटकन सुचला नाही) वाटते. एकतर असे कोणी कुठे म्हटले असे विचारता येइईल. पण तेही बाजूला ठेवू. मला जे अल्प समजते ते असे की कुठलीही एकादी जागा (प्रांत, देश वगैरे) त्याला लागणाऱ्या सर्वच वस्तू व सेवा परवडेल अशा तऱ्हेने निर्माण करू शकत नाही. पण त्या जागेत काही सेवा अथवा/व वस्तू  चांगल्या प्रतिच्या व अल्प शुल्कात करण्याची ताकद असते. तसेच दुसऱ्या कुठच्या जागेत (प्रांत/ देश वगैरे) दुसऱ्या काही सेवा व/अथवा वस्तू अशाच तऱ्हेने निर्माण करण्याची ताकद असते. तेव्हा त्या दोन जागांत ह्या सेवांची/ वस्तूंची देवाणघेवाण (व्यापार) होते. ट्रेडचा हाच पाया आहे. तेव्हा अमेरिकही अनेक गोष्टी/सेवा चांगल्या प्रतिच्या बनवते आणि अनेक इतर वस्तू/सेवा ती तसे बनवू शकत नाही, पण इतर देश स्वस्तात व चांगल्या प्रतिच्या बनवू शकतात, म्हणून ती (अमेरिका) त्यांच्याकडून आयात करते.

नुसते अमेरिकेने कुठल्या देशाला सांगितले, व त्यामुळे (बहकून जाऊन) त्या देशांनी अमेरिकेला निर्यात चालू केली, हे विधान हास्यास्पद वाटते.

अमेरिकेच्या आयत/ निर्यातीत जो फरक आहे, त्याची त्यांना आता जबरजस्त डोकेदुखी झालेली आहे. विशेषतः चीनच्या संदर्भात हे सर्वाधिक असल्याने ते आता (गेले वर्ष/ दीड वर्ष) चीनवर रेनमिबीचे फेरमुल्यन करण्यासाठी दबाव टाकत आहेत.

पण नीट विचार केला तर असे दिसते की हे सर्व साधनसामुग्री, मनुष्यबळ स्वस्तात अमेरिकेला मिळाले त्यामुळे ते श्रीमंत झाले. असे वर्षानुवर्षे केले गेले. त्यांचे जीवनमान समृध्द झाले. आणि आपले ? विषमतेची दरी, बिघडलेली तरुण पिढी, माजलेले नवश्रीमंत आणि देखभाल करणारे कुणीही नसल्याने एकाकी आयुष्य कंठणारे वृद्ध !

हे सर्व oversimplification होत आहे, असे आपणास नाही का वाटत?  अमेरिकेने दुसऱ्या देशांना स्वस्तात निर्यात करण्यास उद्युक्त केले, व एव्हढ्याच कारणामुळे तो देश इतका मोठा, बलाढ्य वगैरे झाला, श्रीमंत झाला? त्याचे स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही?

आपण ........ संगणक आज्ञाप्रणाली विकसन इत्यादी गोष्टीच फक्त निर्यात कराव्या. रुपयाचे मुल्य काही झाले तरी संगणक आज्ञाप्रणाली विकसन क्षेत्राला कमी धक्का लागेल कारण उपलब्ध पर्याय कमी आहेत.

हेही फारसे बरोबर असेल असे वाटत नाही. पूर्व युरोपियन देश (रुमानिया वगैरे), विएतनाम व चीन आपल्याला ह्याबाबतीतही स्पर्धा देत आहेत. व ही स्पर्धा जास्त तीव्र होत आहे. आपल्याला अशी complecancy  अजिबात परवडणारी नाही.