सोपा करून लिहता आला असता. आज रुपया डॉलरच्या तुलनेत ताकदवान होत आहे म्हणजेच एक डॉलर घेण्यासाठी तुम्हाला कमी रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे परदेशी प्रवासासाठी जाणाऱ्यांना ते स्वस्तात पडेल. मात्र निर्यात करणाऱ्या आयटी कंपन्यांना ते महागात पडतं कारण त्यांना मोबदला डॉलरमध्ये मिळतो‌. साहजिकच भारतात वेतन वगैरे देण्यासाठी त्यांना कमी रुपये हातात मिळतात.त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो. मात्र यावरही उपाय आहे. या कंपन्या डॉलर प्रथम युरो किंवा पाउंड सारख्या चलनात बदलून घेतात आणि नंतर त्याचं रुपयात रुपांतर करतात. कारण रुपया जेवढा डॉलरच्या तुलनेत ताकदवान आहे तेवढा तो युरो किंवा पाउंड च्या तुलनेत नाही.( बहुधा यालाच हेजिंग म्हणतात ) आताच इन्फोसिसचे चांगले तिमाही निकाल लागूनही तो शेअर घसरला ,याचं कारण हेच. यापुढे आयटी आणि फार्मा कंपन्यांना ( सिप्ला,रणबक्षी) या ताकदवान होणाऱ्या रुपयाचा त्रास होणारच.