छोटी बहर हे आकर्षण. चांगली निभावली आहे. ही तसेच या आधीच्या गझलांमधून अशी छोटी बहर अज़मावल्यानंतर, बऱ्यापैकी आत्मविश्वास आला असेल, असे वाटते. त्यामुळे आता आपण मध्यम बहरांकडे वळावे, असा प्रेमळ सल्ला द्यावासा वाटतो. कृपया विचार करून पहावा.

काही असे घडावे
नजरेस तू पडावे

शेर चांगला आहे. काही(तरी) असे घडावे (नि/की) तू नज़रेस पडावे. पडावे ज़ऽऽरासे खटकले. कदाचित छिद्रान्वेषीपणा वाटेल; पण प्रामाणिक मत आहे, राग नसावा. पण काफियाच गळला, तर मग पर्यायी शब्दयोजना कोणती?

स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?

शेर बव्हंशी सामान्य वाटला.

वैरीहि तो असा की
मन ज्यावरी जडावे

क्या बात है! मस्त शेर!

मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?

आवडला हा शेरही!

मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे?

'की माझ्यासाठी कुणी रडावे', असा अर्थ अभिप्रेत असेल, तर मज़ कुणी रडावे (निदान मला तरी) योग्य वाटले नाही.

पुढील गझललेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.