शब्दाशब्दावर, ओळीओळीवर जीव ओवाळून टाकावा अशी कविता. खूप खूप आवडली. सौंदर्याने मुसमुसलेली पण तरीही शारीर न झालेली अस्सल रचना. खल्लास!
पारिजाताचे बहर तू उधळले देहात माझ्या...!
उधळलेस , असे हवे होते, असे वाटले. छिद्रान्वेषीपणाची गुस्ताखी नाही; पण वृत्तापुढे मान तुकवताना, व्याकरणाचे काय करावे, असा प्रश्न पडत असतो, त्यातलाच प्रकार असावा. असो.