स्वप्न आता पापणीला छळत नाही
 सत्य कुठले भास कुठला कळत नाही       वा...वा...

 मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
राम वनवासात जाणे टळत नाही            सुंदर

तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
(रक्त आहे तेच पण सळसळत नाही)         छान... (तोच चंद्रमा नभात...!)

देठ असता पाकळीला अर्थ आहे
 हे तुला कळते तरीही वळत नाही           अप्रतिम

प्रमोदराव,  अप्रतिम ...काही विचारूच नका. लिहीत राहा...शुभेच्छा...