ततलसणीची चटणी की लसणाची चटणी हा वाद आणि गाडाव लिहायचे का गाढव हा वाद ह्यात खूप फरक आहे.
महाराष्ट्रातील कुठल्याशा बोलीतील अप्रचलित म्हण उध्दृत करणे आणि रुळलेली म्हण अट्टाहासाने अशुद्ध लिहिणे या दोघातही फरक आहे.


अर्थबोध होतो ना? मग कशाला व्याकरण शुद्धलेखन वगैरे भानगडी हा एक नेहमीचा मुद्दा.
इंग्रजीत yesterday he go to london असे म्हटल्यावर जवळजवळ सगळ्यांना अर्थबोध होईल. किंवा she eat cake म्हटले तरी. पण ते शुद्ध इंग्रजी नाही. आणि तसे लिहिणार्‍याबद्द्ल फार चांगले मत होणार नाही. तोच प्रकार पानी आणि लोनी ह्यांचा लेखी मराठीत आहे.
शिवाय असे नियम नसतील तर अर्थाचा अनर्थ होणे जास्त सहज शक्य आहे.