वाचणार्या आणि प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
ही कथा सुपरवूमनची वगैरे नसून एका सर्वसामान्य स्त्रीची आहे. शेअर्स ते चुलीवरची भाकरी म्हणजे काही फार नव्हे, तेवढे कोणीही करते. ज्याला / जिला गॅसवर भाकरी करता येते तिला / त्याला चुलीवर करणे अशक्य नाही. मला वाटते जे कोणी एखाद्या कार्याला वाहून घेतात, खडतर परिस्थितीत पराकोटीचे प्रयत्न करून एखादा व्यवसाय यशस्वी करतात, काही मूलभूत संशोधन करतात ते सुपरमॅन / सुपरवूमन. बाकीचे आपले कमीजास्त प्रमाणात सर्वसामान्यच!
कथेतीला 'गोडव्याचा' कुणी उल्लेख करेल असे वाटत होतेच. तो जाणीवपूर्वक आणलेला आहे.
बकुळ