वेगळेपण विरघळाया लागले
उमलुनी मी परिमळाया लागले

भासला तो चंदनाचे रान; मी
नागिणीसम सळसळाया लागले

व्यक्त मी आलिंगनी झाले अशी
प्रेम त्यालाही कळाया लागले

लाजण्या-रुसण्यात सरली रात्र अन्
तांबडे फुटुनी छळाया लागले

छान, सुरेख...संयत रचना...
शुभेच्छा मृण्मयी.