मिलिंदराव,
छान, जोरदार गझल.

कारा अभेद्य जेथे मी बंदिवान आहे
आहे तुरुंग काया, मन अंदमान आहे

आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे

नशिबास कोसुनी का सुरई जवळ करावी?
जो नीळकंठ होतो त्यालाच मान आहे

आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे

बोलावले न त्याने,  गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे

या शेरांविषयी काय बोलायचे...?  सारेच आवडले. जोरदार.  शुभेच्छा