गाडी चालवत असताना सिग्नल, लेन, वेगाची मर्यादा, गतिरोधक अशी बंधने असतात. त्याने एका जागेकडून दुसर्‍या जागेकडे जायला जास्त वेळ लागतो पण त्याने वाहतुकीला शिस्त लागते. अनेक वाहने एकाच वेळी व्यवस्थित जाऊ येऊ शकतात. एखादा अशा नियमाविरुद्ध नाक मुरडत असेल पण थोडा विचार केला तर ही बंधने आपल्या हिताची आहेत.
तसेच भाषेचे नियम हे आपले विचार मांडायला एक शिस्तबद्ध साचा उपलब्ध करुन देते. नियम पाळून लिहिणे आणि शब्दबंबाळ लिहिणे ह्यात फरक आहे. एक आहे म्हणून दुसरेही आहे असले काही नाही.

नारायनऐवजी नारायण लिहिल्यामुळे लिखाण बोजड आणि शब्दबंबाळ होते? कसे काय बुवा? आणि त्यामुळे अर्थ कमी लोकांपर्यंत पोचतो? कसा काय बुवा?

  शुद्ध लिहिणे आणि विद्वत्ताप्रचुर, संस्कृतप्रचुर लिहिणे ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.