बोलावले न त्याने,  गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे
वाव्वा. मस्त.

ह्या स्वाभिमानावरून खालील शेर आठवला---

ख़ुल्द में भी ख़ुसरुआना शान से जायेंगे हम
गर वहाँ पुरसिश न होगी तो पलट आयेंग हम

स्वर्गातही मी खुसरोच्या (इराणचा एक प्रसिद्ध राजा) ऐटीत जाईन. तिथे मला कोणी विचारले, पुसले नाही तर मी लगेच परत येईन, असे कवी म्हणतो. चू. भू. द्या. घ्या.

रान, शान, इमानही विशेष. गझल जोरदार आहे. आवडली.