अदिती,
बहोत खूब!!! विडंबन भारी आहे. (त्याच्या निमित्ताने इतर दिशांनाही एक-दोन बाण सोडलेले दिसतायत, इतर काही 'मिसळ'लेले दिसत्येय).
आहे तुरुंग जाया, मी फूल म्लान आहे
आता हरेक नारी मातेसमान आहे
ह्म, समस्त चतुर्भूज पुरुषांच्या सनातन जखमेवर मीठ चोळलस तू.

काव्यात वार होती, मीही प्रयत्न केला
तल्वार ही न हाती नुसतेच म्यान आहे
प्रयत्न भन्नाट आहे. तलवारबाजीतील उस्ताद निघालीस.

एकेक चीज आता 'रंगेल' झ्याक ऐशी
रस्ता खुला समोरी,तोंडात पान आहे
तोबा, तोबा, आम्ही नाही हो त्यातले!

ता. क. 'रात नीली नीली है' हे गाणे कधी ऐकल्याचे आठवत नाही. नवीन आहे का?