दुकानात नवीन स्टॉक आल्यावर जुना स्टॉकही कसा खपवता येतो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. मस्त विडंबन. आवडले. सगळेच शेर अगदी सहज़ आले आहेत. नुसतीच योग्य पर्यायी शब्दांची योजना असली, तरी सहज़ता आल्याने वाचनीय आणि मजेशीर झाले आहे. अभिनंदन!

काही शेर तर खासच झालेत. विशेषकरून -

मज मारलेय त्यांनी सांगू किती ठिकाणी
सगळी कडून सुजली अमची कमान आहे

प्रत्येक चीज आहे खाऊन पाहिले मी
अपवाद फक्त याला ते 'पार्मिसान' आहे

(बाय द वे, पार्मेशन/पार्मिसान चीज़ चवीला तितकेसे खास नसते, उपम्यावर किंवा पोह्यांवर वरून खोबरे-कोथिंबीर भुरभुरावी, तसे पिझ्झ्यावर भुरभुरूनच बरे लागते )

अपमान रोज केला शब्दांत सायबाने
त्याच्या मुळेच माझी हपिसात शान आहे

बोलावले न त्याने,  गेलो तरी घरी मी
निर्लज्य आसण्याचा मज स्वाभिमान आहे

केलीस येव्हढी तू घाई उगाच मजला
घालायची विसरलो माझी तुमान आहे

पण -

गातात भाट-चारण व्वा व्वा सुभान् अल्ला
कंपूत जोकरांच्या राणी महान आहे !

राणी? भाट वगैरे राजाची, राजपुत्राची, राणीची स्तुस्ती करत असले, तरी 'राजा'शी संबंध जास्त. म्हणजे राजाने राणीला 'ज़्ज़ा! वेड्डी कुठली!' म्हटले, तर भाटांनीही म्हणावे, अशी राजस्तुती (किंवा 'राजा'स्तुती) त्यामुळे इकडे या शेरात 'राणी' खटकली. असो. इतिहासातही असे राणीचे गुणगान करणारे भाट असल्याचे ऐकण्यात-वाचण्यात आले नाही. असो.

पु. ले. शु.