अदितीताई,
क्या बात है! एकदम फर्मास विडंबन. सगळे शेर आवडले. अभिनंदन आणि पु. ले. शु.
ता. क. आम्ही कोणत्याही प्रकारचे विद्यादान / अध्यापन केलेले नसूनही आपण आम्हांस गुरुचा दर्जा दिलात याबद्दल अत्यंत आभारी आहोत. मात्र ते "श्री श्री खोडसाळपंत" वाचून आम्ही डोईवरील केसांची व दाढी-मिशांची लांबी चाचपून पाहिली. आता 'द आर्ट ऑफ विडंबन' चे वर्ग चालवण्याचाही विचार आहे. त्या 'श्री श्रीं'च्या शिष्यगणाने हलकेच घ्यावे ही नम्र विनंती.