स्वराज, नाराज होऊ नका.
दुनिया आपापल्या नियमांनी चालते. ते जाणून घेतले तर आपण निश्चिंत होऊ शकतो.
मराविमंच्या तुम्ही म्हणता त्या नियमाचा हिसका मीही खाल्लेला आहे.
म्हणून हे अनुभवाचे बोल सांगतो आहे.
आम्ही घर सोडले. नव्या जागी राहायला गेलो. दुसऱ्याच महिन्यात मराविमंनी बिलामध्ये "Faulty Since" ची पाटी लावणे सुरू केले. अनेक महिन्यांपर्यंत आम्हाला ते आणि त्याचा अर्थच लक्षात आला नाही. आम्ही जे येईल ते बिल भरत होतो. नंतर लक्षात आले की आम्ही राहत नसतांना मोठमोठाली बिले कशी येत आहेत? चौकशी करता कळले की बिलामध्ये "Faulty Since" ची पाटी लावलेली असेल तर सरासरीवर आधारित बिल देतात. मग अनेकदा मराविमंमध्ये दातांच्या कण्या करून ती पाटी नाहीशी केली. पुढे अनेक महिने आम्हाला उणे बिल येत असे.
पुन्हा सहा महिन्यांनी ये रे माझ्या मागल्या. मात्र, ह्यावर उपाय काय हे विचारता आम्हाला सांगण्यात आले की घर सोडतांना मराविमंला सूचना द्यावी. ती सहा सहा महिन्यांनी नवी करावी.
आता आम्ही सुट्टीवरही १५ दिवसांपेक्षा जास्त जाणार असलो तरी मराविमंला सूचना देतो. आणि पाटीबाबत सतर्क राहतो. मराविमंच्या नाकर्तेपणाचा हा ग्राहकाला कायमचाच त्रास झाला आहे.
मात्र हा उपाय काम करतांना दिसत आहे. कळावे.