आठवणी जाग्या झाल्या. फारच मस्त लेख! अजून चालू देत.
तुम्हाला अर्धवट आठवणारे गाणे-

"कोरा कागद, निळी शाई
आम्ही कुणाला भीत नाई
अर्धा लिंबू अस्से!
बोला, दगड का माती?"

असे आहे का? ते 'दगड का माती?' खेळाचे गाणे!
'अर्धा लिंबू' आणि 'लिंबूटिंबू' हे काय प्रकरण आहे तेही सांगावे. मग "हे बघ तुमच्या दगडावर.." , "हे बघ तुझ्या मातीवर.." हे ही आठवत असेल.
आजकाल शहरात दगड आणि माती दोन्हीही असणे दुरापास्त होते आहे.