आवडले हो विडंबन केशवराव. तुमची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. पार्मिज़ान/ पार्मिज़न काय आले आहे. चीज झाले विडंबनाचे. कुणी कुणी काहीही म्हणो, आम्हाला तुमचा तथाकथित 'तोच तोच पणा' भयंकर आवडतो. मुख्या ह्या विडंबनातदेखील तुमची तुमान न विसरता आली आहे.
इतका कुठे इथे मी हो भाग्यवान आहे
आहे घरात सासू, घर अंदमान आहे
काय मतला आहे सुबहान अल्लाह! पुनरुक्ती न करता अंदमानाशी न्याय केला आहे.
आश्चर्य आज ह्याचे ती ही पशू निघाली
मज वाटले मिळाले मोकाट रान आहे
अभिनंदन! पशू निघाली
गातात भाट-चारण व्वा व्वा सुभान् अल्ला
कंपूत जोकरांच्या राणी महान आहे !
भन्नाट! कीस पाडत बसणार नाही. असो.
किती दाखले द्यायचे! मानले तुम्हाला. तुमच्या तळपायांचे झोरेस काढून पाठवून द्या.