गातात भाट-चारण व्वा व्वा सुभान् अल्ला
कंपूत जोकरांच्या राणी महान आहे !
प्रत्येक चीज आहे खाऊन पाहिले मी
अपवाद फक्त याला ते 'पार्मिसान' आहे
अपमान रोज केला शब्दांत सायबाने
त्याच्या मुळेच माझी हपिसात शान आहे
बोलावले न त्याने, गेलो तरी घरी मी
निर्लज्य आसण्याचा मज स्वाभिमान आहे
केलीस येव्हढी तू घाई उगाच मजला
घालायची विसरलो माझी तुमान आहे
उपयोग काय झाला सांगून "केशवा"ला?
त्याचे विडंबनाचे चालू दुकान आहे
हे सर्व मस्तच! केशवा, तुमचे दुकान "चालू" आहे म्हणून तर आम्ही इथे फिरकायची हिंमत करतो.