पार्मेशन/पार्मिसान चीज़ चवीला तितकेसे खास नसते, उपम्यावर किंवा पोह्यांवर वरून खोबरे-कोथिंबीर भुरभुरावी, तसे पिझ्झ्यावर भुरभुरूनच बरे लागते
खास अमेरिकन उच्चार पार्मेजान (उमरावजान इश्टाईलमध्ये. इटालियन बहुधा पार्मेजानो चू.भू.दे̱. घे) पण त्याला दिलेली खोबरे-कोथिंबीरीची "उपमा" बरोब्बर आणि मस्त! तशी खोबऱ्याची उपमा अधिक सार्थ ठरावी कारण पार्मेजान चीज सुके आणि ओले मिळते. त्यापैकी सुके पिझ्झ्यावर तर ओले काही इतर पदार्थांवर. उदा. चिकन पार्मेजान किंवा एगप्लांट पार्मेजान. वेगवेगळ्या टॉमेटोसॉससोबत हे चीज चविष्ट लागते. (नुसते खायला आपले खोबरेच बरे.
) ऑलिव गार्डन नाहीतर ब्राव्हो!ला एक भेट दिली तर पार्मेजानची चव तोंडात रेंगाळते.