इटालियनमध्ये उच्चार पार्मिजानो असा आहे. हे चीज मुख्यत:  इटली एमिलिया-रोमान्या विभागात तयार होते, पार्मा, बोलोन्या (माझे पूर्वीचे शहर), मोदेना ही काही मुख्य शहरे. इथे विभागाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची चीजे (अनेकवचन?) आहेत आणि प्रत्येक विभागाच्या लोकांना त्याचा कट्टर अभिमान आहे. पास्तावरही खोबरे-कोथिंबीरीप्रमाणे चीज भुरुभुरुन घेतात. शिवाय बऱ्याचदा सॅलडच्या डिशमध्ये टोमॅटो आणि चीजचे गोळे असतात. इथे चीज हरप्रकारे वापरले जाते. पास्ताच्या सॉसमध्ये, तळलेल्या भाज्यांबरोबर, (अर्थातच) पिझ्झामध्ये आणि वर इ.

चीज असल्याशिवाय इथल्या जेवणाचे चीज होत नाही.  

हॅम्लेट