आम्ही बेसबॉल सारखा खेळ लहानपणी खेळलो आहे. चौकोनाच्या ४ कोपऱ्यात गोल आखायचो. जर आधी ठरवले आणि मुले जास्ती असतील तर आणखीन गोल. प्रत्येक गोलात एकजण उभा राहयचा. प्रतिस्पर्धी टीम मधले चेंडू टाकायचे. मारणारा पुठ्ठ्याने मारायाचा. बेसबॉल पाहिल्यावर कळले की आम्ही हाच खेळ वेगळ्या स्वरूपात खेळायचो.
हा खेळ जवळपास १५-२० वर्षे आधी खेळायचो. कधी हा खेळ आमच्या खेळाच्या यादीतून बाहेर गेला आठवत नाही. बहुतेक कोणीतरी बेसबॉल पाहून आम्हाला शिकवला असेल.