दोन प्रश्न
१ दुसरी नोकरी हातात आहे का (आहे तिच्याहून लाभदायक)
२ कंपनीने कागद ठेवुन घेतले याला काही पुरावा - म्हणजे त्याची पावती वगैरे आहे का?
कायद्याने असे करता येत नाही. एखादा उलट्या खोपडीचा कामगार न्यायाधिश भेटला तर कंपनीच्या संचालकाना याबाबत न्यायालयात हजर होण्याचा हुकुम देउ शकेल.
मुळात हल्ली नोकरी देताना प्रमाणपत्रे मागतात का? असल्यास स्पष्टपणे खरा प्रकार सांगावा; नव्या नोकरीत रुजू झाल्यावर सरळ नोंदणीकृत टपालाने जुन्या कंपनीला कागदपत्रे परतीची आज्ञा करावी, प्रत कामगार अयुक्तालयाला द्यावी. फुकट असे गिऱ्हाईक आल्यास सरकारी खाती उत्साहाने दाद देतात व उलटपक्षी त्या कंपनीला हैराण करतात.