हे गाणं दगड का माती खेळाचच आहे.

ज्याच्यावर राज्य येतं त्याने हे गाणं(हा प्रश्न असतो राज्य असलेल्यावर) झाल्यावर सांगायचं कि त्याला चौकोनाच दगड भाग हवा का माती. त्याने उत्तर दिल्यावर बाकिच्यांनी दुसर्याभागात पटकन जायचं.

खेळ सुरुझाला की मुद्दाम त्या राज्यवाल्या च्या एरियात जाऊन "आम्ही तुमच्या दगडावर..." म्हणायचं आणि त्याने आऊट करायच्या आत आपल्या एरियात यायचं.

अर्धा लिंबू म्हणजे दगड आणि माती च्या सिमारेषेवर उभं राहाण्याची परमिशन... राज्य असलेल्याचं फ्रस्ट्रेशन वाढवण्यासाठी हा नियम :-).

या गाण्यात अजुन २ वाक्य आहेत...

". चिडायची बात नस्से.

चिडलं तर सात राज्य घ्यावी लागतील.."