भयंकर मोठा आवाज ठेवूनच भक्ती(?) करता येते असे गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनावर ठसले आहे. ठसवले जाते आहे. हा करतो म्हणून मी पण तेच करणार ही चढाओढ वाढत चालली आहे. प्रत्यक्षात भक्तीचा लवलेशही कुठे नसतो. ही केवळ उत्सवप्रियता आहे. १० दिवस गणपती झाले आता ९ दिवस नवरात्र, पुढील महिन्यात दिवाळी येईल. दिवाळीच्या आधीच फटाक्यांना सुरूवात होईल. रात्री २ वाजता बॉम्ब फोडणारे महाभाग आहेत. माणसांना एवढी साधी बुद्धी नसावी की आपल्यामुळे कुणाला त्रास होतोय?
त्या अमेरिकेला आणि पाश्चात्यांना आपण चंगळवादी म्हणून हिणवतो. पण आपण स्वतः काय आहोत? हा सगळा चंगळवाद नाही तर काय आहे? प्रसारमाध्यमे याचे संस्कृती म्हणून कौतुक करतात. संस्कृती ही अशी असते?
आणि ध्वनीक्षेपकाचे म्हणाल तर प. रेल्वेच्या कोण्त्याही स्थानकावर गेलात तर तिकडेही इतक्या प्रचंड आवाजात उद्घोषणा दिल्या जात असतात की कानठाळ्या बसतात. थोडक्यात कसलाही विचार न करता सर्व चालले आहे.
तुम्ही मांडलेली समस्या अनेकांना सहन करावी लागत असेल. पण तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय.केवाका म्हणतात त्याप्रमाणे दुसऱ्याचा विचार करणारे "अल्पसंख्य" आहेत.