बऱ्यापैकी लांबीचा असला तरी केवळ आवडलेला लेख इतरांनाही सांगावा या हेतूने, आपण इथे टंकित केला त्याबद्दल आभार. डॉ. कल्याण काळेंनी मांडलेले कार्यकर्त्री आणि विट्ठल यांच्याबद्दलचे मुद्दे लक्षणीय आहेत. यावरूनच सिंहाचा उच्चार आपण सिंव्ह असा करत असलो, तरी सिंहगडाचा उच्चार मात्र आपण जसे लिहितो तसाच का होतो, हा एका अनुदिनीवर उपस्थित झालेला प्रश्न आठवला.