शुद्धलेखनाची सध्याची समस्याच इतकी कठीण होऊन बसली आहे, की अनेक दिशांनी तिच्या निरसनार्थ प्रयत्न झाले, तरच परिस्थिती सुधारण्याची थोडीफार आशा आहे.
मराठीचे शुद्धलेखन ही विचार करण्याची, स्वारस्य असण्याची, त्यावरचे आपले विचार, कळकळ दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या तळमळीची आणि एकंदरच एखादी 'महत्त्वाची'/'मोलाची' गोष्ट आहे, असे अनेकानेक विचारवंतांना, बुद्धिवंतांना वाटू लागले तर ह्या आशेस दिवसेदिवस वाढती बळकटी येईल असे वाटते.
मराठी शुद्धलेखन ह्या विषयावरचा हा लेख मनोगतींना वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल वरदा ह्यांना धन्यवाद.
मनोगताचा शुद्धिचिकित्सक वापरायला अधिक सुकर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, हेही ह्या चर्चेच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.