निनाद,

ओरिजिनल सर्टीफिकेट द्यायच्या अगोदर त्याची झेरॉक्स प्रत तुमच्या मित्राने स्वतःजवळ आहे याची खात्री केलेली का? तसे असल्यास ती प्रत ओळखीच्या कोणाकडून ज्यांना तुमच्या मित्राने ते कोर्स खरंच केलेले आहेत हे माहिती आहे - अटेस्टेड करून घेऊन नवी नोकरी शोधता येऊ शकते. राहिला प्रश्न अनुभवपत्राचा - याचा प्रश्न प्राथमिक चाचण्यापरीक्षांमध्ये पास झाल्यानंतर येतो आणि जर ती परीक्षा दणक्यात पार करता आली तर पुढील गोष्टींवर थोडेफार पुढेमागे जायला कोणीही फार काकूं करत नाहीत असा व्यक्तिगत अनुभव आहे. तसेही करीअरच्या सुरुवातीच्या काळातील ६ महिन्याचा अनुभव हा कितपत गणला जाईल याबद्दल शंकाच आहे. नविन नोकरी मिळाली की मग सद्य कंपनीतल्या त्रासदायक प्राण्यांना ठिकाणावर आणायला वेळ असल्यास तसे करण्यास काहीच अडचण उरणार नाही.

सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रतदेखील स्वतःजवळ ठेवली नसल्यास तुमचा मित्र एकतर फारच भोळा आहे म्हणावे लागेल नसता फारच बिनधास्त. कधीही ओरिजिनल कागदपत्रे कोणालाही कुठल्याही कारणास्तव सुपुर्त करताना गरजेची काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीच्या संदर्भात अटेस्टेड सर्टीफिकेटस खूप झाले, ओरिजिनल द्यायची ती काय जरूर?

'अडकलो आहोत' असा भाव तुमच्या मित्राने बाळगला तर त्याला अडकवायला आज ही कंपनी आहे उद्या दुसरी निघेल.. काहिसे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस !

सारांश - दगडाखालचा हात काढताना सर्रकन काढला तर हात जास्त खरचटतो म्हणून हलकेच काढून कमीतकमी खरचटेल असे बघावे असे म्हणतात, पण याहीपेक्षा जर एका हाताने दगडच उचलून दुसरा हात एकही ओरखडा न लागता लिलया मोकळा करून घेता येतो का हे बघणे हे जास्त श्रेयस्कर आहे असे मला वाटते. आजवरचा माझा अनुभव धमाल आहे याबद्दल... :-) ना रहेगा बास और ना बजेगी बासूरी !