तुम्ही वर्णन केलेली अवस्था प्रत्येक विचारी माणसाच्या मनाची होते. आयुष्य हे कसं जगायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. कित्येकदा ही मनाची अवस्था सर्वकाही मिळवल्यावर सुद्धा येते, तर कधीच कांही मनासारखे न झाल्यामुळेही येऊ शकते. सामान्य पातळीच्या वर येऊन बघण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षांत येईल की दुसऱ्यासाठी सुद्धा आयुष्य जगता येते. अडचणीत असलेल्या कोणाला मदत केली तर त्याच्या चेहेऱ्यावरचा जो आनंद दिसतो तो पहाण्याचे सुख अवर्णनीय असते! मी स्वतःच्या अनुभवावरुन सांगू शकतो की असे केल्याने माझ्या दुःखाची तीव्रता खुपच कमी झाली आहे. नाहीतरी आपले आयुष्य मनासारखे घडले नाही, तर निदान आपले उर्वरित आयुष्य, अनुभव इतरांच्या कामी आला, तरी त्यांच्या आयुष्यात तरी चार क्षण सुखाचे यावेत!