दसऱ्याला आपट्याची पाने वाटणे आता कालसंगत राहिले नाही हा विज्ञानवादी दृष्टीकोनाचा भाग झाला. त्यात मतभेद होऊ शकतील. संगणक चालू ठेवून आपण फारतर वीज वाया घालवून त्यामुळे वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत होणाऱ्या प्रदूषणाला नाममात्र कारणीभूत होत असू. (तेही उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढवून - कार्बनचे नव्हे!)- पण तेही आपली मानसिक गरज भागवण्यासाठी. झाडे तोडू नयेत आणि सण साजरे करताना आता त्यांचे स्वरुप बदलणे आवश्यक आहे ही नव्या पिढीतली जागरुकता समजून न घेता प्रदीप यांनी केलेली ही तिरकस शेरेबाजी अनाकलनीय (आणि दुःखदरीत्या अनपेक्षित) आहे.