सामान्य पातळीच्या वर येऊन बघण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षांत येईल की दुसऱ्यासाठी सुद्धा आयुष्य जगता येते. अडचणीत असलेल्या कोणाला मदत केली तर त्याच्या चेहेऱ्यावरचा जो आनंद दिसतो तो पहाण्याचे सुख अवर्णनीय असते!
ह्याचे एक उदाहरण इथे पहा.
सुनंदा अवचटांनी मुक्तांगण स्थापन केल्यानंतर काही वर्षांतच त्यांना कॅन्सरची व्याधी जडली. त्या जीवघेण्या दुखण्याशी आठ वर्षे झगडतांना त्यांनी त्यांची कार्य अविरत चालू ठेवले. अनिलांच्या लेखात त्याचे विशेष तपशील आहेत, ते थक्क करून सोडणारे आहेत तसेच अत्यंत स्फूर्तिदायक आहेत.
वास्तविक अनिलांचा लेख हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, पण आता येथे तसा संदर्भ आला, म्हणून हा दुवा देत आहे.