आपट्याची पाने वाटणे हे प्रातिनिधिक आहे, व त्यातून कितीशी झाडतोड होते? माझ्या अंदाजाप्रमाणे अत्यल्प. ह्याउलट संगणक, नेटवर्काचे सगळे भाग (राउटर्स वगैरे), सर्वर्स इत्यादी जेव्हा सदैव मनोरंजनार्थ वापरले जातात, (सर्फिंग करणे, इंटरऍक्टिव्ह खेळ खेळण्यासाठी इत्यादी) तेव्हा कितीतरी कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडला जातो, तो नगण्य नक्कीच नाही, व मी इथे उगाचच अतियशोक्ती करीत नाही. पण हे असे केले जाते, ते मनोरंजनार्थ. तद्वतच वर्षातून एका दिवशी आपट्याची पाने तोडली जातात तेही काही विशिष्ट भावनेतून. कुठल्याही जुन्या रीतिरिवाजाला नाकारतांना तारतम्य बाळगले पाहिजे असे मला वाटते. बळीचा बकरा देणे इत्यादी रूढी झुगारल्या पाहिजेत, व आपण सातत्याने तसे करतोही आहोतच. पण आपट्याची पाने वाटणे कुणालाही इतके का खटकावे ह्याचे मला आश्चर्य वाटते. 

असो, ह्यामधे उगाचच तिरकसपणा करण्याचा हेतू नव्हता. तसे वाटले असल्यास मी संजोपांची क्षमा मागतो.