जरी मला दसऱ्याला आपट्याची पाने वाटायची प्रथा बदलायची गरज वाटत नसली तरी विषय निघालाच आहे म्हणून सांगतो बरीच झाडतोड होतेच!! पनवेल जवळ एक गाव आहे जिथे आम्ही हनुमान जयंतीला दरवर्षी जातो. तिथे ५-७ वर्षांपुर्वी ४-५ आपट्याची झाडं होती. आजमितीस केवळ एक जाड जगलं आहे बाकीची पान तोडून तोडून मेली. दादर/वाशी मंडईमध्ये जा आणि ज्या प्रमाणात पानं आणली जातात त्या वरूनच याचं प्रमाण लक्षात येईल.
असो! काही प्रथा अशा असतात ज्यात भावना गुंतलेल्या असतात. मंबईत दहिसरला एकच आपट्याचं झाड आहे. दरवर्षी त्यातील केवळ ठराविक फांद्यांच तोडुन त्या भविकांसाठी लुटायला उपलब्ध केल्या जातात उर्वरित झाड तसंच मजेत उभं असतं.. तसं सगळीकडे केल्यास हा प्रश्न सुटावा.
पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा!