आयव्ही ला मराठीत काय म्हणात हे मला खरोखरीच माहीत नाही. एकदा गारवेल असे भाषांतर करावे का असा विचार आला होता पण तशी खात्री वाटेना म्हणून आयव्ही तशीच ठेवली.
पोकरबाबतही 'शेकोटीमधे निखारे सारण्याचा, सारखे करण्याचा दांडू' असा शब्दप्रयोग सुरुवातीला केला होता पण तो खूप कृत्रिम वाटायला लागला. 'त्यांच्याच शेकोटीत निखारे सारायच्या दांडूने त्यांच्यावर प्रहार झाला' हे वाचून मलाच हसू आले. म्हणून पोकर हा शब्द तसाच ठेवला. भाषांतर करताना सहजता ठेवावी असा दृष्टिकोन होता.
भाषांतर करताना सगळ्याच गोष्टींचं भाषांतर करता येत नाही असं वाटतं आहे.
पॅलाडिओ बाबतही तुम्ही म्हणता तोच संदर्भ असणार. मला वास्तुरचनेतलं फारसं कळत नाही. आणि इथला पॅलाडिओ चा उल्लेख अगदीच कोरकोळ वाटला. ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स च्या वेळी जसं एरिया म्हणजे काय हे समजलं नसतं तर गोष्ट उकलली नसती तसा हा संदर्भ नाही. केवळ घराची वैशिष्ट्यपूर्ण रचना दाखवण्यासाठी तो योजला असावा असं वाटलं म्हणून त्यावर अधिक खोलात जाऊन माहिती काढली नाही.
पॅलाडिओ हे एका माणसाचं नाव आहे हे माहीत नव्हतं त्यामुळे ""pillared in front after the fashion of Palladio या वाक्याचं भाषांतर करताना जराशी चूक झाली आहे. ते वाक्य 'पॅलाडिओ वास्तुरचनेत शोभणारे पद्धतीचे खांब होते' असं वाचलं तर योग्य अर्थ लागेल असं वाटतं आहे.
चुकीबद्दल अत्यंत खेद वाटतो. उदार मनाने क्षमा करावी ही विनंती.
--अदिती