आपट्याची पाने वाटणे इ. गोष्टींना फारसा अर्थ नसला तरी त्या तितक्याश्या हानीकारकही नाहीत.

एक अनुभव सांगतो.
शुक्रवारी वाकड येथील मारुती शोरूमला मित्रासोबत भेट देण्याचा योग आला. त्याने दसऱ्याच्या (शुभमुहूर्ताच्या) निमित्ताने गाडी घेतली आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी तेथे गेलो होतो. तिथल्या विक्रीप्रतिनिधीशी सहज बोलताना या दसऱ्याला ४५० गाड्यांची डिलिवरी आहे असे कळाले. त्यातल्या ४० गाड्या तर केवळ एसएक्स-४ या हाय-एंड मॉडेलच्या आहेत. ही गाडी विकत घेणाऱ्यांकडे आधीची एक चारचाकी गाडी असण्याची शक्यता ५० टक्क्याहून अधिक आहे. ही गोष्ट केवळ आडबाजूला असलेल्या एका दुकानातील चारचाकी गाड्यांची.

साई सर्विस, चौगुले, डीएसके वगैरे मोठे डीलर्स तर खूप जास्त गाड्या विकतात. दुचाक्यांशी संख्या वेगळी.  या निमित्ताने पुण्यात किती गाड्या वाढल्या असतील? ध्वनी-हवा प्रदूषण किती वाढेल याचा नुसता विचार केला तरी डोके (अजूनही बधीर झाले नसल्यास) सुन्न होईल.

सॉक्रेटिसचा एक विनोद आठवला...
एकदा सॉक्रेटिस बाजारात हिंडत असताना त्याच्या मित्राने त्याला पाहिले आणि विचारले, "अरे, तू बाजारात? तू इकडे कसा?"
सॉक्रेटिस म्हणाला, "मला गरज नसलेल्या वस्तूंची यादी किती मोठी आहे हे पाहत आहे."

असो.