माझे आबा आता हयात नाहीत, त्यांच्याबद्दल कधीमधी बाबा-आऊ यांचं तोंडी बोलणं सोडलं तर दुसरं काहीच नाही माझ्याकडे - या सर्वांची माझ्या मनालाही सतत टोचणी असते.
वेदश्री,तुझे अनुभव वाचून माझे आजीआजोबा आठवले,खरचच आपल्याकडे शेवटी आठवणींशिवाय काहीच उरत नाही.
तू तुझ्या आऊची मुलाखत सदृश्य काही का घेत नाहीस? मी माझ्या आजी आजोबांची अशी मुलाखत टेप करून ठेवली होती.त्यावेळी तर फक्त टेपरेकॉर्डरच होते.आता कॅमकॉर्डर आहेत,तू त्यांची आठवणी सांगणारी असे मुलाखतवजा टेप केलेस तर तुझ्या आनंदाचं ते कायमस्वरूपी निधान राहिलं. (हे मी स्वानुभवावरून सांगते आहे.)
स्वाती