होय. अनिल आणि ऋषीकेश यांनी जे केले ते अभिनंदनीयच आहे.मी सध्या U.K. मध्ये आहे, कामानिमित्त. येथे सगळे भारतीय निमूटपणे सगळे स्वच्छतेचे नियम पाळतात. तेच भारतीय भारतात मात्र ते नियम पाळतांना दिसत नाहीत. माझ्याबाबत सांगायचे झाले तर, मी स्वतः आणि माझी पत्नी आणि तीन वर्षे वयाचा माझा मुलगा आम्ही, पुण्यात असतांनाही आणि येथेही काटेकोरपणे सगळे नियम पाळतो. मुलाला ही स्वच्छतेचे धडे लहानपणापसूनच मी देत असतो.

आणखी एक म्हणजे, येथे ट्राफिक चे नियम, रस्ता ओलांडतना पादचारी (pedestrians ) साठी खास signal असतो. तो हिरवा झाल्याशिवाय कुणीही रस्ता ओलांडत नाही. आणि जेथे सिग्नल नसतो तेथे कार आपणहून थांबतात आणि रस्ता ओलांडू देतात ...कार चालवणारा हसून आपल्याला respect देतो...

आणि पुण्यात कर्वे रोड वर जर बघीतले तर प्रत्येक जण प्राण मुठीत घेवुन रस्ता ओलांडताना दिसतो.

सामान्य माणसाच्याच हे हातात आहे ...

तेथे सरकार वगैरे काही करू शकत नाही....