आमच्या संकूलाने यावर टिपऱ्या (दांडिया) हा पर्याय शोधला आहे. नेहेमीच्या गरब्यासाठी फार आवाजाची गाणी वाजवली जातात. (त्यांचीही गरज असते अशातला भाग नाही). पण दांडियासाठी केवळ ठेका देणारं हळू आवाजातील संगीतही चालतं. कारण या टिपऱ्यांचा लयबद्ध आवाजच एतका मोहक असतो की त्यापुढे तो ठणठणाट मुर्खपणाच वाटतो. फुकटच्या गलक्यापेक्षा हा टिपऱ्यांचा नादबद्ध आवाज अजिबात त्रासदायक नसतो असं अगदी वृद्ध वगैरे सगळ्यांनी यावर्षी आवर्जुन सांगितलं. (त्यांच्या मते तर हा दंडिया बघताना मजा तर आलीच पण त्या नादावर स्वतःही नाचावसं वाटलं आणि त्रास तर अजिबात नाही झाला. )