इतकं हृदयस्पर्शी भावगर्भ काहीतरी वाचल्यावर मी ते फोनवर पप्पाना वाचून दाखवलं. पप्पाना आवडलं...मग मम्मी. तिलाही भावलं. पप्पाना गप्पा मारायला खूप आवडतात. गप्पा आणि शिकार. शिकार एकदाच त्यान्नी सशाचीच केली होती. शिकारीच्या गप्पा ते वाघ मारल्यासारख्या मारतात. धाकटा भाऊ सू (सूरज) घरी नव्हता त्यामुळे तो वाचला नाहीतर त्यालाही वाचून दाखवणार होतो. सू कविता करतो. तुमच्या लिखाणावर गो नी दांडेकरांची छाया आहे असे मम्मी म्हणाली.
धीरज