कथा/अनुभव थेट शैलीसकट खूप आवडला. आमच्या एका दाक्षिणात्य मित्राची आठवण झाली. तो २-३ दा मुंबईला हीरो होण्यासाठी पळून गेला होता. न्हाव्याच्या दुकानातील 'मायापुरी'चा प्रभाव असावा. काळा-सावळा पण रेखीव होता. त्याला आम्ही प्रेमाने काल्या म्हणायचो. मुंबईत असताना कुठल्याशा हाटेलातल्या आर्केस्ट्र्यात शब्बीरकुमार, मुन्ना अजीजची गाणी (हा एक वेगळा च्याप्टर आहे) म्हणायचा.  पेताड संघटनेच्या बैठकीत तो नेहमीच 'फार्मात' यायचा. आला की तो मुंबैच्या गमतीजमती सांगायचा. मुन्ना अजीज, रफीची  गाणी म्हणायचा. 'दुनिया जालिम है दिल तोड के हंसती है' टाइप. त्याचा काळासावळा रेखीवपणा अगदी लखलखायचा. अशावेळी न राहवून मी त्याला नेहमी म्हणायचो, " काल्या यार तूने हमेशा गलत ट्रेन पकडी. एपीबिपी पकडनी थी. आजतक एनटीआर बन गया होता.'