चांगले झाले आहे.

होम्स सारख्या बौद्धिक चमत्कृती ऍगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकात नसतात - उलट प्रत्येक कथेत एखादी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीच्या आधारे मार्पलबाई / टॉमी - टुपेन्स आणि अर्थातच हर्क्यूल पॉयरॉ कोडे सोडवतात.

राहिला प्रश्न चमत्कृती नसल्याने होणाऱ्या रसभंगाचा - तर ही ज्याची त्याची आवड आहे!

सध्या मी आणि माझी सौ. रोज पॉयरॉ कथांचे व्हीडिओ बघत आहोत. ते संपत आले आहेत.  एक दिवस आम्ही रुचीपालट म्हणून एक होम्स कथा  (व्हीडिओ)  पहायला सुरुवात केली आणि १५ मिनिटांनी बंद करून  "संपू दे संपले तर व्हीडिओ" असे म्हणत "मर्डर ऑफरॉजर ऍक्रॉईड" कडे वळलो. (बाय द वे आम्ही दोघांनीही होम्स आणि पॉयरॉच्या सगळ्या कथा वाचलेल्याही आहेत तरीही रसभंग झाला नाही).

("मर्डर ऑफरॉजर ऍक्रॉईड" हा रहस्यकथेचा एक वेगळाच नमुना आहे - तसला दुसरीकडे फक्त एकदा वाचला होता - सुहास शिरवळकरांच्या एका पुस्तकात - पण 'ओरिजनल' असा कुठेच नाही )

असो - चू. भू. द्या घ्या

अमित