राजसाहेब, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव असाच असेल असे नाही. चाळीसगाव सारख्या लहानशा गावात राहताना (जिथे इंटरनेट बँकिंग वाल्या आयसीआयसीआय, एच डी एफ सी अशा बँका नाहीत) कमीत कमी उपलब्ध सुविधांचा वापर करून बुकिंग वगैर केली आहेत. परत प्रश्न विश्वासार्हतेचा सुद्धा असतो. डायरेक्ट इंटरनेटवरून बुकिंग करण्यापेक्षा रोटरी सदस्य असणाऱ्या व्यक्तीकडून (त्याच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी रोटरीचा धागा तर आहे) बुकिंग करणे मला जास्त भरवशाचे वाटले. शिवाय इतक्या लांब जायचे आणि तेही बायको मुलांना घेउन, तर आपण चार चौघांना त्यांचे अनुभव विचारून जाणे केव्हाही चांगलेच, नाही का? लेखमाला वाचताय आणि प्रतिक्रिया सुद्धा दिली म्हणून मनापासून आभार.