ट्राफिक चे नियम..
हे मी अमेरिकेत अनुभवले. एका वळणावर पादचाऱ्यांना किंवा गाड्यांनाही सिग्नल नव्हता. तेव्हा मी आणि माझा सहकारी रस्ता ओलांडणार होतो. तेवढ्यात उजवीकडून येणाऱ्या गाडीचालकाने आम्हाला बघून गाडी दुरूनच लगेच थांबविली. आम्ही रस्ता ओलांडल्यानंतरच त्याने गाडी पुढे नेली. तसेच पार्किंग मधून, हॉटेल मधून गाड्या बाहेर काढणारेही...
बाकी नियम तोडणारे तिथेही मी बघितले. फारशी गर्दी नसताना सिग्नल तोडुन गाड्या नेणारे तिथेही पाहिले. हा गुण (?) आपण लोकांनी तर तिकडे नाही न पाठवला?