चार्ल्स डिकन्सच्या या कादंबरीचे मराठी भाषान्तर प्रथम कै.वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९४६ मध्ये केले आणि ते माझ्या माहितीप्रमाणे कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या आत्तापर्यंत चारपाच आवृत्या निघाल्या आहेत. त्यातली एक य. गो. जोशींनी(आनंद मुद्रणालय, १५२३ सदाशिव,पुणे ३०) १९७३ मध्ये छापली होती. मूळच्या हजार पानांची कथा इथे १६० पानात आणली होती.
डेव्हिड कॉपरफील्डचे "नंदन कालेलकर" या नावाचे एक भाषांतर होते, पण ते तितकेसे चांगले नव्हते असे ऐकले आहे. ते पुस्तक फारसे प्रसिद्ध नाही. परशुराम देशपांडे(अ-७, लक्ष्मी अपार्टमेंटस ३४४ शनवार, पुणे११) यांचे पुस्तक पाहण्यात आलेले नाही. त्याचे नावही ठाऊक नाही.
आणखी भाषान्तरे असल्याचे कुणास माहीत असल्यास इथे लिहावे.