ठ्ठ ख्ख ढ्ढ थ्थ ह्यांचे उच्चार खरे म्हणजे अनुक्रमे ट्ठ क्ख ड्ढ त्थ असेच होतात असे मला वाटते. लिहायला सोपे वाटते म्हणून ते ठ्ठ ख्ख ढ्ढ थ्थ असे लिहावेसे वाटत असतील आणि सहज लिहिले जात असतील आणि त्यातूनच प्रथा पडून गेली असेल.
ठ ला ठ जोडायचा असेल तर ठ (ट+ह) तला ह सुरू झाल्यावर त्या ह ला पुढच्या ठ तला ट जोडता यायला हवा. ते कठीण (अशक्य) आहे. ट्ठ मध्ये ट ला पुढच्या ठ तला ट जोडला जाणे सोपे (शक्य) आणि नैसर्गिक वाटते.