निगडित ह्या शब्दातील डि/डी च्या ह्रस्व-दीर्घाबाबत मला शंका आहे म्हणून मी तो तारांकित केला. माझ्या मते निगडीत हा शब्द इत् प्रत्यय लागून तयार झालेला शब्द नाही, त्यामुळे डी दीर्घ असायला हवा. लेखामध्ये तो हृस्व लिहिलेला असल्याने मी तारांकित केला. निगडीत मधील डि/डी हृस्व हवा वा दीर्घ? माझे मत चुकीचे असल्यास जाणून घ्यायला आवडेल.