देव पूजा आणि पौराणिक भाकड कथा सोडून आपण कधी जगायला शिकणार. वर आमच्या प्रत्येक पौराणिक कथेला वैज्ञानिक द्रुष्टीकोण असतो अशी शेखी मिरवण्या साठी एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो.. अशी केविलवाणी धडपड.
रात्री रोज झोपताना थंड दुध पिल्यास पित्त कमी होते, कोजागरीची गरज नाही.
'गप्पा, गाणी, गोष्टी चंद्र-प्रकाश-विहार' कधीही छानच, २५ ऑक्टो हा वीक डे, दूसर्या दीवशी सुट्टी नाही, रात्री १२ वाजता चंद्र प्रकाशात 'गप्पा गाणी गोष्टी' करून २६ ऑक्टो ला लाल डोळ्यांनी पेंगुळलेल्या अवस्थेत कर्तव्य चोख बजावता येइल का?
समजा हा सण २६ किंवा २७ ला साजरा केला (वीक एंड, शुक्र, शनी), दुसर्या दीवशी आराम करून परत सोमवारी कर्तव्य बजावता येइल. मला नाही वाटत देवी नाराज होइल, उलट देवीला हे खूप आवडेल व ती छानसा वर देइल.
भारतीय राज्य घटना सगळ्या नागरीकांना वैज्ञानिक द्रुष्टीकोण बाळगण्या साठी प्रोत्साहीत करते. प्रथा आणि परंपरांना 'तर्क संगत, बूद्धी संगत' प्रश्न विचारून काळाच्या प्रवाहात वैज्ञानिक कसोटी वर उतर्ण्याची गरज निर्माण झाली आहे.
माझी प्रतीक्रीया आवडली नाही तर क्षमस्व.