तुका म्हणे हेच बरोबर कारण तो मराठी शब्द आहे, संस्कृत नाही. संस्कृत शब्दांमध्ये सामान्यतः ह ला जोडून दुसरे अक्षर असेल तर त्यात ह चा उच्चार आधी असतो. हृस्व, चिह्न हे बरोबर कारण ते संस्कृत शब्द आहेत. म्हणणे हे क्रियापद संस्कृत नाही, मराठी आहे, त्यामुळे तेथे म्हणेच योग्य आहे, ह्मणे नाही.

अद्वैतुल्लाखान म्हणतात की ब्राम्हण, चिन्ह वगैरे शब्द उच्चारायला ब्राह्मण, चिह्न पेक्षा सोपे आहेत. मला तसे वाटत नाही. ब्राम्हण, चिन्ह  हे ब्राह्मण, चिह्न पेक्षा लिहायला जास्त सोपे असले तरी उच्चार मात्र ब्राह्मण, चिह्न असेच सोपे आहेत.