हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात म्हणून आनंद झाला, मिलिंद फणसे. 
तुम्ही म्हणताय तसं माझ्याही लक्षात आलं होतं.मूळ कवितेत 'तू नसता तर'च आहे. पण तिथे 'नसतास तर'  असं हवं होतं खरं म्हणजे. नाही तर टपोरी मराठी बोलल्यासारखं वाटेल असं मला वाटलं. म्हणून 'नसल्यावर' कानांना खटकत असूनही त्याचा तसाच वापर केला. 
शब्दांच्या वापराबद्दल सगळे तुमच्यासारखेच जागरूक असायला हवेत अशी आशा करूया....