वृकोदरांचे महात्मा फुले यांच्या साहित्याबद्दल चे मत समजले नाही. महात्मा फुले यांचे संपुर्ण सहित्य बोली भाषेतील आहे. कृपया संदर्भासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशीत केलेले त्यांचे समग्र वाड:मय पहावे. त्यामधे संपुर्ण बोली भाषेचाच वापर आहे.
उदा.
"जो गडी (रावन) सिताबाई (सिता) नी शीवल्या बाणाला उचलला नाय त्या गड्यानी आक्की सिता कसी बरी उचालली?"
"बामनानी सम्भु देवासारक्या कुनब्या, मराठ्या, भोल्या शेतकर्यासनी राख पाजुन दिली, हे आमच्या सिवाजीराव राजास माहीत हुतं पण तो काय करणार बिचारा, आजुन आउक्शवंत आसता तर बामनाच्या मुंड्या कापिला आसता. बायांची मुंडी भादरनार्या या भटांस्नी काय बरं म्हनावं?"
"पाद्री म्हनतु सगळी मानसं सारखी हायीत, कुनाला जात नाय, येवडच नाय तर बाया गडी ही पण सारखीच हायीत, सगळ्यासनी शेम म्हनावं, मग भट का म्हन्तु तो पाद्री काफिर हाय? काफिर कोन हाय पाद्री का भट?"
आनेक मराठी साहीत्यीकांनी आपल्या पुस्तकांमधे बोली भाषेचा वापर केला आहे. एक दोन ओळी नव्हे तर संपुर्ण पुस्तकासाठी.
उदा.
१. नामदेव ढसाळ - "तुजी यत्ता कंची", "झवता जोंधळा ऊसात"
२. दया पवार - "भिवा जलमला तवा आभाळात चांदनी पण पडली नाय आन त्याला सुर्य पण सफरचंदासारखा दिसला नाय. त्याला दिसली ती उतरंड, त्याजं मडकं तळातल, त्यानी ते बगलंला काडुन ठीवलंया आता तुमीच त्या मडक्याला सोन्याचं बनवा, शाळा शिकुन"
कदाचीत वरील लेखकांना मराठी व्याकराणाचे भान नसावे. (???)
मला आजुन एक प्रश्न आहे. आपण "होता" चा नकारार्थी "नव्हता" का लिहीतो? "नहोता" का नाही?