माझ्या पुढच्या भागांपैकी एका भागामधे तुमच्या प्रश्नाचे साविस्तर उत्तर असणारच आहे, परंतु इथे थोडक्यात असे सांगता येईल की चंद्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून पृथ्वीस टॉर्क वा रस्सीखेच अनुभवास येते. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती मंद होत असून त्याचा परिणाम म्हणून चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे. त्यामुळे आसाचा कल शून्य होण्याची शक्यता फारच कमी.